शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

घनकचरा विलगीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:23 PM

नाशिक महापालिकेचा इशारा : पाचशे ते दहा हजार रुपये दंडाची वसुली

ठळक मुद्दे नाशिककरांना येत्या १ एप्रिलपासून ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत टाकावा लागणार आहेनाशिकमध्ये घनकच-याचे विलगीकरणाचे प्रमाण अवघे २५ ते ३० टक्के असल्याचा दावा खुद्द महापालिकेचेच अधिकारी करत आले आहेत

नाशिक - नाशिककरांना येत्या १ एप्रिलपासून ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत टाकावा लागणार आहे. अन्यथा, नागरिकांकडून ५०० रुपये तर व्यावसायिकांकडून तब्बल १० हजार रुपयांचा दंड वसुल केला जाणार आहे. याशिवाय, जे नागरिक अथवा व्यावसायिक घनकचरा विलगीकरण करणार नाहीत, त्यांचा कचरा येत्या १५ एप्रिलपासून घंटागाडीत स्वीकारला जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट शासनाने सर्व महापालिकांना ३१ मार्चपर्यंत घनकचरा विलगीकरणाकडे लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकांनी ८० टक्क्यांपर्यंत घनकचऱ्याचे विलगीकरण केले नाही तर सर्व प्रकारची शासकीय अनुदाने रोखण्याचा इशारा दिला आहे. नाशिकमध्ये घनकच-याचे विलगीकरणाचे प्रमाण अवघे २५ ते ३० टक्के असल्याचा दावा खुद्द महापालिकेचेच अधिकारी करत आले आहेत. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ओला व सुका कचरा विलगीकरणाबाबत गांभीर्याने घेतले असून येत्या १ एप्रिलपासून जे नागरिक ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या घंटागाडीत टाकणार नाहीत, त्यांना ५०० रुपये तर व्यावसायिकांना १० हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. १५ एप्रिलपर्यंत जे नागरिक अथवा व्यावसायिक वर्गीकरण करुन स्वतंत्रपणे कचरा घंटागाडीत टाकणार नाहीत, त्यांचा कचरा न स्वीकारण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यामुळे, नागरिकांना ओला कचरा हा कागदी पिशवी अथवा वेष्टनाद्वारे तर सुका कचरा स्वतंत्र कचरादाणीतून घंटागाडीत टाकणे क्रमप्राप्त ठरणार आहे.सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडमहापालिकेने घनकचरा विलगीकरणाबरोबरच शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे अथवा रस्त्यावर घाण करणे, लघुशंका अथवा उघड्यावर शौचविधी करणे यासाठीही दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पालपाचोळा, प्लॅस्टिक, सर्व प्रकारचा कचरा, रबर आदी जाळल्यास त्याकरीता ५ हजार रुपये, मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचा कचरा जाळल्यास त्याकरीता २५ हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास १० हजार रुपये, रस्त्यांवर घाण केल्यास १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास २०० रुपये तर उघड्यावर शौच केल्यास ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न