सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्या आठ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३,३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकांनी राडारोडा टाकल्याने तीन व्यावसायिकांना ६,४०० रुपये दंड केला, तर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांनी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आला आहे, मात्र तरीदेखील विनामास्क फिरत नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी एका नागरिकाला २०० रुपये व उघड्यावर लघुशंका केल्या प्रकरणी दोन नागरिकांना ६०० रुपये दंड करण्यात आला. घरोघरचा व सार्वजनिक ठिकाणचा ओला, सुका व घातक कचरा वर्गीकरणबाबत घंटागाड्यांची पाहणी करून संबंधित घंटागाडी सुपरवायझर यांना सूचना देत नागरिकांत जनजागृती करण्यात आली. सदर मोहिमेत स्वच्छता निरीक्षक उदय वसावे, किरण काळे, मंगेश बागुल उपस्थित होते. (फोटो ०७ पंचवटी)
पंचवटीत अस्वच्छता करणाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:11 AM