महापालिका पंचवटी विभागाचे विभागीय अधिकारी विवेक धांडे, सहायक अधीक्षक भूषण देशमुख आदि पथकासह कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना कराव्यात, यासाठी जनजागृती करत असताना हिरावाडी रोड परिसरात रात्री उशिरापर्यंत बर्फ गोळा विक्री दुकान सुरू होते,
तसेच दोन ग्राहकांत सामायिक अंतर नव्हते, शिवाय बर्फ गोळा देणाऱ्या कारागिरांनी हातात ग्लोज घातले नव्हते. त्या दुकानदारावर कारवाई करत पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ७ वाजेनंतर जीवनावश्यक वस्तू दुकाने वगळता अन्य सर्व आस्थापना बंद करण्याबाबत आदेश काढले आहेत; मात्र तरी सदरचे आदेश धुडकावून सायंकाळी ७ वाजतानंतर दुकान सुरू ठेवल्याने कारवाई करण्यात आली आहे, असे मनपाच्या सूत्रांनी सांगितले.