मालेगाव : सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक विभागातर्फे नियमित पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते. यात कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्टाचे संबंधित अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्षपणे भेटतात त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतात.टपाल खात्यामार्फत ११ सप्टेंबर रोजी अधीक्षक डाकघर मालेगाव विभाग, मालेगाव यांच्या कार्यालयात३ वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. विभागातील निवृत्त कर्मचाºयांच्या पेन्शनसंबंधी तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तक्रारींची या डाक पेन्शन अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे उत्तराधिकारी तथा धोरणात्मक स्वरूप संबंधित तक्रारी अदालतीमध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. तक्रारींचा उल्लेख तपशिलासह केलेला असावा. उदा. दिनांक व ज्या अधिकाºयास मूळ तक्रार पाठवली असेल त्यांचे नाव, हुद्दा इत्यादी माहितीसह अधीक्षक डाकघर, मालेगव विभाग, मालेगाव यांच्या कार्यालयात ७ सप्टेंबरपूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवाव्यात.
मालेगाव येथे ११ सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:21 PM
मालेगाव : सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक विभागातर्फे नियमित पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते.
ठळक मुद्देकायदा संबंधित प्रकरणे उत्तराधिकारी तथा धोरणात्मक स्वरूप संबंधित तक्रारी