ओझरटाऊनशिप : येथील देवभूमी जनशांती धामात नव्याने बांधण्यात आलेल्या विविध देवी-देवतांच्या मंदिराबरोबरच या धामात गणपतीचे स्थान आहे. श्रीशांतीमहागणेश, बालगणेशसह प्रामुख्याने अष्टविनायक दर्शनाचा लाभ भाविकांना होत आहे. आश्रमाच्या वतीने ओझरसह परिसरातून येणाऱ्या नागरिकांना आणि विविध कार्यकारी-सहकारी संस्थांच्या पदाधिकारी, कर्मचारी यांना रोजच्या महाप्रसादाबरोबरच महाआरतीचा सन्मान देण्यात येत आहे.महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या अथक प्रयत्नातून ओझर येथिल देवभूमी जनशांती धाम येथे संतमेळासह शेकडो देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यात भगवान बाणेश्वर महादेवासह नवग्रह,अष्टमूर्ती शंकर , अष्टलक्ष्मी, दिशा देवता , राम दरबार, लक्ष्मी-नारायण, मुक्ताई,म्हाळसामाता, शिवभक्त अिहल्यादेवी ,राधा-कृष्ण,विठ्ठल-रु क्मिणी, जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज, शांतीमहागणेश,अष्टविनायक,बालगणेश अशा एकूण दहा गणपतींचे स्थान आहे.भाविकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अष्टविनायकाच्या दर्शनाबरोबरच विविध देवी-देवतांच्या दर्शनाचा लाभ होत आहे.आश्रमाच्या वतीने ओझरसह परिसरातून येणार्या भाविकांना आण िविविध कार्यकारी-सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी ,कर्मचारी यांना रोजच्या महाप्रसादा बरोबरच महाआरतीचा सन्मान देण्यात येत आहे. गणेशोत्सव सोहळा यशस्वीतेसाठी आश्रम व्यवस्थापन समितीचे स्वामी परमेश्वरानंद महाराज ,ज्ञानेश्र्वर मामा भुसे , व्यवस्थापक दीपक भाऊ मेधडे, ज्ञानेश्वर माऊली आदी परिश्रम घेत आहेत.
ओझरवासीयांना लाभतेय अष्टविनायकाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 2:23 PM