नाशिकरोड : पीपल्स रिपाइंच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.पीपल्स रिपाइंच्या वतीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईच्या घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर घटनेतील आरोपी मनोहर कदम यांचा दाभोलकर हत्त्याकांडातील संशयितांना प्रशिक्षण देण्याबरोबर शस्त्र पुरविल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. कदम याला अटक करून देशद्रोही घोषित करण्यात यावे. तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मागासवर्गीयांबद्दल काढलेल्या अपशब्दाबाबत माफी मागण्यात यावी, सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी व शहरातील झोपडपट्टी धारकांना दमबाजी करून धमकविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शशिकांत उन्हवणे, देविदास डोके, सोपान जाधव, मुरली घोरपडे, भिकाजी सावंत, रंगनाथ शिंदे, देवराम जंगम, रवि खरात, सीताबाई कातकाडे, अलका निकम, शालिनी सिंग, संगीता वाघ, कांताबाई पाल, विमल गिरी, रत्नमाला पाथरे, कल्पना सोनवणे, लीलाबाई जंगम आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
पीपल्स रिपाइंची निदर्शने
By admin | Published: June 22, 2016 11:58 PM