संजय दुनबळे।नाशिक : सातत्याने पडणाºया तीव्र थंडीचा विविध पिकांवर परिणाम जाणवू लागला असून, शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावातील अनेक शेतकºयांच्या निर्यातक्षम मिरची पिकाचे तीव्र थंडीमुळे नुकसान झाले आहे.सारोळे खुर्द परिसरात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील अनेक शेतकºयांनी निर्यातक्षम मिरची पिकाची लागवड केली आहे. मागील दहा ते बारा दिवस सातत्याने पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम मिरची पिकाला फटका बसला आहे. अतिथंडीमुळे मिरचीच्या झाडांचे शेंडे जळून गेले आहेत. याचा झाडाला लागलेल्या मिरच्यांना फटका बसला आहे. मिरची काळी पडणे, पोषण कमी होणे असे प्रकार घडू लागल्याचे सारोळे खुर्द येथील ऋषिकेश जेऊघाले, प्रकाश जेऊघाले, विश्वनाथ डुकरे आदी शेतकºयांनी सांगितले.जून महिन्यात लागवड केलेल्या नंदिता वाणाच्या लवंगी मिरचीचे सुमारे आठ ते ९ महिने उत्पादन मिळत असते. यातील बहुतेक मालाची निर्यात होते किंवा देशांतर्गत विविध बाजारपेठांमध्ये विक्री होत असते. लवंगी मिरचीच्या पिकापासून शेतकºयांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असते. यावर्षी मागील दहा-बारा दिवस पडलेल्या तीव्र थंडीचा फटका या पिकाला बसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.तीव्र थंडीमुळे मिरचीच्या शेतातील काही झाडांचे शेंडे जळून गेले आहेत. झाडाचा शेंडा जळाल्यानंतर त्याची वाढ खुंटते. बºयाचवेळा झाडाला फळ येण्याचे प्रमाण कमी होते. शेंडा जळालेले झाड वाचवण्यासाठी शेतकºयांना शेंडा खुडणीचा खर्च करावा लागतो. खुडणी झालेल्या झाडाला पुन्हा नव्याने शेंडे येणे आवश्यक असते अन्यथा मोठे नुकसान होते असे ऋषिकेश जेऊघाले यांनी सांगितले.शेंडा जळालेल्या झाडाला आलेल्या मिरच्यांचा रंग काळा पडू लागतो. किंवा त्यांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. निर्यातदार असा माल नाकारतात. निर्यातीसाठी पूर्णपणे हिरवी आणि सरळ वाढलेली मिरची आवश्यक असते. अन्यथा या मालाला उठाव राहात नाही. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते, असे विश्वनाथ डुकरे यांनी सांगितले.सारोळे गावातील ७५ ते ८० टक्के शेतकºयांचे तीव्र थंडीमुळे मिरची पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज या शेतकºयांनी व्यक्त केला. प्रकाश जेऊघाले यांनी दोन एकरात मिरचीची लागवड केली असून, या पिकापासून त्यांना चार ते पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.थंडीचा परिणाम झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तूर्तास तरी या परिसरातील शेतकºयांनी शेंडा खुडणीची कामे सुरू केली आहेत. फळबागांनाही काही प्रमाणात फटकाथंडीचा फळबागांनाही काही प्रमाणात फटका बसला असून, शेतकºयांचे नुकसान झाले आहे. खडक माळेगाव येथील विकास रायते यांच्या पेरूच्या बागेचे थंडीमुळे नुकसान झाले आहे. ऐन फळधारणेच्या वेळेत थंडी पडली. त्यामुळे झाडांवर मोठ्या प्रमाणात दव साचले. त्यात थंडीची तीव्रता वाढल्याने झाडांची नवीन पाने जळून गेली. याचा फळ धारणेवर परिणाम झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. द्राक्षाला पर्याय म्हणून शेतकरी फळबागांकडे वळत असले तरी फळबागांनाही लहरी निसर्गाचा मार सहन करावा लागत आहे.
मिरचीच्या झाडांचा जळाला शेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 1:23 AM
नाशिक : सातत्याने पडणाºया तीव्र थंडीचा विविध पिकांवर परिणाम जाणवू लागला असून, शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावातील अनेक शेतकºयांच्या निर्यातक्षम मिरची पिकाचे तीव्र थंडीमुळे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देथंडीचा परिणाम : सारोळे खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना फटका; खुडणीचा खर्च वाढला