नाशिक : शहरासह जिल्हाभरातील व्यावसायिक आणि घरगुती क्सुलासेच्या माध्यमातून जवळपास दहा हजार रोजगार उपलब्ध होतात. परंतु, कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून क्लासेस व घरगुती शिकविण्याही बंद असल्याने क्लासचा व्यावसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. आता हे क्लासेस सुरू होणार असले तरी अवघ्या तीन ते चार महिन्यात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान क्लास चालकांसमोर निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेले क्लास आता पुन्हा सुरू होणार आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे. ?मुळे - नाशिक शहर जिल्हाभरात मोठ्या स्वरुपाचे जवळपास ४५० व्यावसायिक क्लास आहेत. तर छोट्या स्वरुपाचे व घरगुती पद्धतीचे जवळपास आठशे ते नऊशे क्लास आहेत. या सर्वच क्लासेस चालकांसह क्लास शिक्षक व शिक्षकत्तरांचे रोजगार पुन्हा सुरू होणार असल्याने क्लासेस चालकांना दिलासा मिळणार आहे.
प्रश्न - कोरोनाच्या संकटानंतर क्लासेस पुन्हा सुरू करताना क्लासेस चालकांसमोर प्रमुख आव्हाने कोणती असणार आहे. त्याचा सामना क्लास चालक कसा करणार ?मुळे - व्यावसायिक क्लासेसवर ज्याप्रमाणे शिक्षकांचा रोजगार अवलंबून आहे,त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यही क्लासेसवर अवलंबून आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या तीन ते चार महिन्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान क्लासेस चालकांसमोर आहे. त्यासाठी क्लासेस चालकांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. शिवाय मर्यादीत विद्यार्थीसंखेसह क्लास सुरु करताना करताना आर्थिक गणीत जुळविण्याचे आव्हानही क्लासेस चालकांना पेलावे लागणार आहे. परंतु, त्याचा अतिरिक्त भार पालकांवर पडणार नाही याची क्लासेस चालक पुरेपूर काळजी घेतील.
प्रश्न - शिक्षण विभागाने अभ्यासक्रमात कपात केली आहे. हा अभ्यासक्रम उरलेल्या तीन ते चार महिन्यात पूर्ण होण शक्य आहे का ?मुळे - सर्व क्लास चालक नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करून घेणारच आहेत. त्यासोबतच पुढील वर्गात संदर्भ अशलेल्या अभ्यासक्रमाचीही तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाणार आहे.काही क्लासचालकांनी कोरोनाकाळात ऑनलाईन क्लास घेतले,परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता सर्वच अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा क्लास चालकांचा प्रयत्न असणार आहे.
प्रश्न - शाळांप्रमाणे क्लासेस चालक नववी ते बारावीपर्यंतग्या वर्गांनाच शिकविण्याच्या नियमांचे पालन करतील का ?मुळे - हो निश्चितच... व्यावसायिक क्लासेस चालकांनी शाळांच्या नियमांनुसारत क्लासेस सुरू करण्याची परवानगी मागीतली होती. त्यानुसारच क्लासेस सुरू होतील. त्यासाठी स्वच्छता व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचेही काटेकोरपणे पालन केले जाईल. ज्या प्रमाणे प्रशासनाकडून सुचना मिळेल, त्याप्रमाणे पुढील वर्गांचे क्लासेस सुरू होतील.