कसबे सुकेणे : बाणगंगा काठच्या कसबे सुकेणेसह दहा गावांचा रस्ता बंद करून कोंडी करणाऱ्या एचएएल प्रशासनाने कसबे सुकेणे मार्गे ये-जा करणाऱ्या साध्या व शहर बस वाहतुकीला परवानगी दिली आहे. दरम्यान, शालेय बसेस, रुग्णवाहिका, शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य प्रवासी वाहतुकीला मात्र परवानगी नाकारली आहे.कसबे सुकेणे व बाणगंगाकाठच्या गावांचा एचएएल हद्दीतून रस्ता ओझर येथे मुंबई-आग्रा महामार्गाला मिळतो, परंतु कोरोनाचे कारण देत एचएएलने या रस्त्याची नाकाबंदी करून सुमारे दहा गावांची कोंडी केली होती. याबाबत आमदार दिलीप बनकर व कसबे सुकेणे ग्रामपालिकेने रस्ता खुला करावा, अशी मागणी केली होती. खासदार डॉ. भारती पवार, बनकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर एचएएलने कसबे सुकेणेकडे जाणाऱ्या व कसबे सुकेणेकडून येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या साध्या व शहर बसेसला त्यांच्या हद्दीतून ये-जा करण्यासाठी परवानगी दिल्याचे पत्र कसबे सुकेणे ग्रामपालिकेला प्राप्त झाले आहे. पत्रात केवळ शहर बस वाहतुकीचा उल्लेख असून, कृषिमाल व इतर प्रवासी वाहतुकीला परवानगी न दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शालेय बस, खासगी प्रवासी वाहने व शेतमाल आणि रुग्णवाहिका या वाहतुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.एचएएलने ग्रामपालिकेला पाठविलेल्या पत्रात केवळ शहर बस वाहतुकीला परवानगी दिली आहे; परंतु शेतमाल, इतर प्रवासी वाहने, रुग्णवाहिका व शालेय विद्यार्थी वाहतुकीची कोंडी कायम आहे. आम्ही याबाबत पुन्हा आमदारांना निवेदन दिले असून, जुना रस्ता खुला करून देण्याची मागणी केली आहे.- धनंजय भंडारे, उपसरपंच कसबे सुकेणे
एचएएल हद्दीतून सुकेणेकडील शहर बससेवेला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:53 IST
कसबे सुकेणे : बाणगंगा काठच्या कसबे सुकेणेसह दहा गावांचा रस्ता बंद करून कोंडी करणाऱ्या एचएएल प्रशासनाने कसबे सुकेणे मार्गे ये-जा करणाऱ्या साध्या व शहर बस वाहतुकीला परवानगी दिली आहे. दरम्यान, शालेय बसेस, रुग्णवाहिका, शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य प्रवासी वाहतुकीला मात्र परवानगी नाकारली आहे.
एचएएल हद्दीतून सुकेणेकडील शहर बससेवेला परवानगी
ठळक मुद्देअन्य वाहनांची कोंडी कायम : शेतकरी संतप्त