ठळक मुद्देमागणी : मंडप डेकोरेटर्स असोसीयशनचे तहसील दारांना निवेदन
पेठ -गत आठ महिण्यापासून शासनाने धार्मिक, सांस्कृतिक, राजकिय आदी सार्वजनिक कार्यक्रमासह लग्न समारंभावर बंदी घातल्याने मंडप व्यवसाय पुर्ण डबघाईस आला असून यामूळे अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याने शासनाने लॉन्स व मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा 50 टक्के माणसं एकत्र येण्याची किंवा किमान 500 माणसांची मर्यादेस परवानगी द्यावी अशी मागणी पेठ तालुका मंडप डेकोरेटर्स असोसीयशनच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र कर्पे, हेमंत गावंडे , नरेंद्र पठाडे,परशराम भुसारे, हनुमंत गवळी, छबीलदास चौधरी, मनोहर ठाकरे , नामदेव मानभाव , सुनिल पाडवी, किरण मांडवे यांचेसह मंडप व्यावसायिक उपस्थित होते.