नाशिक : ग्रंथालये ही सर्व सामान्यांना वाचक बनविणारी आणि त्यांच्या अभिरूचीवर संस्कार करणारी आहेत. ग्रंथ वाचनाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिरात आयोजित ग्रंथालय सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष य. दा. जोशी होते, तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक मृदुला शुक्ल, शिक्षक प्रतिनिधी अनुराधा अहिरे, पर्यवेक्षक एम. आर. कुलकर्णी, सुनंदा जगताप, रश्मी सराफ, रंजना परदेशी, ग्रंथपाल अरविंद दिघे आदि उपस्थित होते. एकदा वाचन केले की ते जशाच्या तसे स्मरणात ठेवणे ही एक कला आहे. वाचन म्हणजे आकलन झाले पाहिजे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, असेही यावेळी गोविलकर म्हणाले. ग्रंथालय सप्ताहानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील ५७ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी य. दा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. अरविंद दिघे यांनी ग्रंथालय सप्ताहाची माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक मृदुला शुक्ल यांनी केले. अतिथींचा परिचय विवेक पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन स्वाती काळे यांनी केले. यावेळी अतुल करंजे, वैशाली शिंपी, सुरेखा मोंढे, नलिनी पाडवी, लता विसपुते यांच्यासह आदिं मान्यवर उपस्थित होते.
वाचनाने व्यक्तिमत्त्व विकास
By admin | Published: December 13, 2015 10:27 PM