मातोरी : पावसाअभावी परिसरातील टमाटा, वांगी, भुईमूग पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.टमाटा, वांगी अशा पिकांना किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने वाढत्या उष्णतेमुळे अळीची वाढ जोमाने होत आहे, वारंवार कीटकनाशकांचा वापर करूनही कीड आटोक्यात येत नाही. परिसरात टमाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली आहे. यात प्रामुख्याने टमाट्यावर घुबडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी फ्लॉवरचा प्लॉट उपटून टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसाच्या या लहरीपणाचा फटका मातोरी, मखमलाबाद, मुंगसरा परिसरातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बळीराजाला औषधांचा अधिकचा खर्च करावा लागत आहे. (वार्ताहर)
पावसाअभावी पिकांवर कीड
By admin | Published: September 07, 2015 10:35 PM