पेठ : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य, पोलीस, महसूल विभागासोबत पेठ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकही खांद्याला खांदा लाऊन कोरोनाच्या लढाईत आपले कार्य बजावत आहेत.पेठ तालुका हा गुजरात राज्याच्या सिमेवर असल्याने राजबारी येथे विशेष तपासणी नाका कार्यान्वयीत करण्यात आला आहे. या ठिकाणी २४ तास प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पोलीस व महसूल कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून दिवसरात्र वाहनांची कसून तपासणी करून नोंदी ठेवल्या जात आहेत. तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातही तालुक्यातील जनतेला येणाºया समस्या जाणून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.नगरपंचायत क्षेत्रात बाहेरून येणाºया नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी गस्तीवर असून नागरिकांनी आरोग्य तपासणी न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप आहेर, तहसीलदार संदिप भोसले, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे, नम्रता जगताप, अरविंंद पगारे, डॉ.मोतीलाल पाटील, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांचे सह विभागप्रमूख, अधिकारी व कर्मचारी कोरोना लढाईत सामील झाले आहेत.
पेठच्या शासकीय कर्मचाऱ्यांची विविध तपासणी नाक्यावर ड्यूटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 8:47 PM