पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद व अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या व विविध दुर्धर आजाराने पीडित असलेल्या आरोग्य तपासणीत संदर्भित केलेल्या नऊ बालकांवर पेठच्या ग्रामीण रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तालुक्यातील कुपोषित बालकांच्या सदृढ आरोग्यासाठी तसेच योग्य आहार व उपचार मिळावेत यासाठी
कुपोषित मुलांचे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील ८४ मुलांची तपासणी करून कुपोषित बालकांच्या मातांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत खैरे, डॉ. बाबुलाल अग्रवाल, डॉ. तुषार खैरे, डॉ. अभिजित नाईक, डॉ. अबिद अत्तार, डॉ. योगीता पगार, डॉ. पुरुषोत्तम काकड, डॉ. तिलोत्तमा भोये यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी , गट साधन केंद्र कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.