धनंजय रिसोडकर।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, देवळा आणि कळवण ही चार तालुके कोरोनामुक्त होते. मात्र, जुलै महिना सुरू होईपर्यंत प्रारंभी देवळा आणि कळवण तर त्यानंतर सुरगाणा आणि पेठ तालुक्यातही कोरोनाचे काही बाधित आढळून आले. मात्र, जुलैच्या अखेरपर्यंत त्यातील पेठ तालुक्यातील बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असल्याने पेठ तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे.जून महिन्याच्या अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्णातील १५ तालुक्यांपैकी केवळ ११ तालुकेच बाधित झालेले होते. त्यावेळी देवळा, सुरगाणा, पेठ आणि कळवण या तालुक्यांमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे आदिवासी क्षेत्र असलेल्या या भागात किमान कोरोना पोहोचू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जुलै महिन्याच्या प्रारंभीच चारही तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण जिल्हाच कोरोनाबाधित झाला होता. त्यात दोन बाधितांपासून प्रारंभ झालेला पेठ तालुका गत २५ दिवसांत १९ बाधितांपर्यंत आकडा पोहोचला होता. या सर्व बाधितांवर तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. या १९ बाधितांपैकी १७ बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याने तो पूर्णपणे कोरोनामुक्त झाला. या तालुक्यातील केवळ दोनच बाधितांचा जुलै महिन्याच्या पूर्वार्धातच मृत्यू झाला होता. कळवण तालुकाही कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्णातील कोरोनाबाधित तालुक्यांमध्ये सगळ्यात कमी बाधित हे पेठ, कळवण आणि सुरगाणा या तीन तालुक्यांमध्येच होते. त्यातील कळवण तालुक्यातही रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतण्याचे प्रमाण मोठे आहे.आता कळवणला केवळ दोन कोरोनाबाधित तर सुरगाण्याला १३ बाधित उरले आहेत. कळवणला अवघे दोन बाधित उरले असल्याने नवीन बाधित न आढळल्यास कळवणची वाटचालदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.दोन तालुक्यांत नाही एकही मृत्यूजिल्ह्णातील १५ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांमध्ये आतापर्यंत कमी अधिक प्रमाणात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. त्यातील सगळ्यात कमी म्हणजे केवळ एक मृत्यू त्र्यंबकेश्वर तालुक्यात, दोन मृत्यू पेठ तालुक्यात झाले आहेत, तर सुरगाणा आणि कळवण या दोन तालुक्यांमध्ये अद्याप एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या इतक्या थैमानातही हे दोन तालुके त्यामानाने सुदैवी ठरले आहेत.
पेठ तालुका कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:01 PM
नाशिक : जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, देवळा आणि कळवण ही चार तालुके कोरोनामुक्त होते. मात्र, जुलै महिना सुरू होईपर्यंत प्रारंभी देवळा आणि कळवण तर त्यानंतर सुरगाणा आणि पेठ तालुक्यातही कोरोनाचे काही बाधित आढळून आले. मात्र, जुलैच्या अखेरपर्यंत त्यातील पेठ तालुक्यातील बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असल्याने पेठ तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे.
ठळक मुद्देसुवार्ता : सुरगाणा, कळवण तालुक्यांत नाही एकही कोरोनाबळी