शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पेठेनगर : चादरीचा आडोसा धरत गॅस कटरने शटर कापून पाच लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 15:25 IST

चोरट्यांनी ३५ मोबाईल, २० ब्लूटूथ स्पीकर, ६०पॉवर बँक,१७ एअर पॅड, लॅपटॉप व सॉफ्टवेअर असा एकूण सुमारे ५ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याची फिर्याद कोठारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

ठळक मुद्दे३५ मोबाईल,२० ब्ल्युटुथ स्पीकर, ६० पॉवर बँकवर डल्ला'चादर गँग'चे कृत्य सीसीटीव्हीत कैद

नाशिक : पेठेनगर कॉर्नर येथील प्रगती मार्केटमधील एका मोबाईल विक्रीच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने शटर कापून दुकानात प्रवेश करत सुमारे ५ लाख रुपयांचा माल गायब केल्याची घटना बुधवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाला लक्ष्य करत विक्रीसाठी असलेले मोबाईल, ब्ल्युटुथ स्पीकर, पॉवर बँक, लॅपटॉप अशा महागड्या वस्तु चोरट्यांनी लुटून पोबारा केला आहे.प्रगती मार्केटमध्ये प्रितेश विजय कुमार कोठारी यांचे मागील दोन वर्षापासून मोबाईल शॉपी चे दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२) रात्री साडेनऊ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पावणे आठ वाजेच्या सुमारास त्यांना येथील कामगार गोपाल प्रजापती यांनी संपर्क करत दु्कानाचे शटर कापून चोरी झाल्याचे दिसत असल्याचे सांगितले. माहिती मिळताच प्रितेश हे दुकानाजवळ पोहचले. दुकानाचे शटर कापलेले आणि काचेचा दरवाजा तोडलेला त्यांना आढळून आला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. तातडीने घटनास्थळी पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी धाव घेत पाहणी केली केली.चोरट्यांनी ३५ मोबाईल, २० ब्लूटूथ स्पीकर, ६०पॉवर बँक,१७ एअर पॅड, लॅपटॉप व सॉफ्टवेअर असा एकूण सुमारे ५ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याची फिर्याद कोठारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.'चादर गँग'चे कृत्य सीसीटीव्हीत कैदपहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चारचाकीमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी या दुकानाभोवती चादरीचा आडोसा धरत गॅस कटरद्वारे शटर कापून दुकानात प्रवेश करत मिळेल त्या वस्तु बॅगेत भरुन पोबारा केल्याची घटना या दुकानाशेजारी असलेल्या दुसऱ्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्यांनी प्रितेश यांचे दुकान फोडल्यानंतर या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरसुध्दा सोबत नेला आहे. जेणेकरुन पोलिसांना माग काढता येणार नाही; मात्र शेजारील दुकानाच्या कॅमेऱ्यांनी त्यांचा हा प्रताप टिपल्याने पोलीस त्याअधारे तपास करत आहेत. दोन पथके तयार करुन चोरट्यांच्या मागावर धाडण्यात आली आहेत.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीMobileमोबाइलtheftचोरी