नाशिक : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबतच्या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी करण्यात येत असून, महाराष्ट्र जलसंपती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी (दि.२७) जलचिंतन संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर येत्या ४ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली.जायकवाडी धरणातून अप्पर गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याचा गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या आदेशास आगाऊ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच सोडलेले १२ टीएमसी पाणी पिण्यासाठीच वापरण्याची अट घातलेली होती. जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यासंदर्भातील सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. पुढील सुनावणी याबाबत ४ डिसेंबरला आहे. दरम्यान, जलचिंतन संस्थेने जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या याचिकेवर ९ नोव्हेंबरला आदेश दिला. त्यामुळे जलचिंतन संस्थेने जलसंपत्ती नियामक प्राधिकरण व गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या निर्णयाविरोधात काल सहभाग याचिका दाखल केली. या याचिकेतून जलसंपत्ती नियामक प्राधिकरण व गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे आदेश गंगापूर धरण समूहाबाबत कसे चुकीचे आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर ४ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाविरोधात याचिका
By admin | Published: November 27, 2015 10:57 PM