संजय पाठक, नाशिक- मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
नाशिकच्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय तुंगार यांनी भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठिंब्यानेही याचिका दाखल केली आहे.काल ही याचिका दाखल झाली असून आज त्यावर सुनावणीची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा धरण समूहातून नऊ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महा मंडळाने दिले आहेत. मुळातच नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यातच पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यालाच अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे विरोध केला असून काल याचिका दाखल करण्यात आली आहे त्यावर आज त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे जायकवाडी धरणातील मृतसाठा वापरण्यासाठी परवानगी द्यावी तसेच महामंडळाच्या आदेशाला स्थगिती द्यावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत