शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अर्जात ‘मुलीचे नाव’ हा पर्यायच नसल्याची बाब समोर

By admin | Published: February 06, 2015 2:16 AM

अर्जात ‘मुलीचे नाव’ हा पर्यायच नसल्याची बाब समोर

नाशिक : महापालिकेच्या वतीने एकीकडे सातत्याने ‘बेटी बचाव’चा उद्घोष सुरू असताना, दुसरीकडे याच धोरणाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. महापालिकेकडून जन्मदाखला मिळावा, यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जात ‘मुलीचे नाव’ हा पर्यायच नसल्याची बाब समोर आली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण घटत असल्याने केंद्र, राज्य शासनाच्या वतीने सर्वदूर ‘बेटी बचाव’चा जागर सुरू आहे. महापालिकेच्या वतीनेही याबाबत जाहिराती, फलकांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गर्भलिंगनिदान करणाऱ्या शहरातील सोनाग्राफी लॅबवरही कारवाई करण्यात आली होती. मुले व मुली यांच्या जन्मप्रमाणातील तफावत घटावी आणि भविष्यात मुलांइतकेच मुलींचेही प्रमाण असावे, यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेच्याच कारभारातून ‘बेटी बचाव’च्या धोरणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. जुन्या पंडित कॉलनीतील नाशिक महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात शहरातील एका ज्येष्ठ व्यक्तीला याचा अनुभव आला. सदर व्यक्ती या कार्यालयात आपल्या नातीच्या जन्माचा दाखला मिळवण्यासाठी गेले. त्यासाठी त्यांच्याकडून संबंधित अर्ज भरून घेण्यात आला; मात्र या अर्जात बालकाचे नाव लिहिण्यासाठी फक्त ‘मुलाचे नाव’ हाच पर्याय उपलब्ध होता. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी अर्जाचे स्वरूप तसेच असल्याचे सांगितले. मुलगा आणि मुलगी दोन्ही समान मानले जात असताना, महापालिकेच्या जन्मदाखला अर्जात मुलीचे नाव हा पर्याय नाही. यामुळे महापालिकेकडूनच एकप्रकारे मुलींवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)