नाशिक : खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून गेल्या पाच वर्षांत पेट्रोल-डिझेल सारख्या इंधन दरात वाढ करण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. पेट्रोल दरात लिटर मागे गेल्यापाच वर्षांत जवळपास दहा ते करा रुपयांची वाढ झाली असून डिझेलच्या दरांमध्ये अकरा ते बारा रुपयांची वाढ झाली आहे. परंतु, गेल्या पाच ते दहा वर्षांपूूर्वी इंधनदरवाढीच्या विरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेणाऱ्या राजकीय सघटनांनीही त्यांची आंदोलने गुंडाळली असून राज्य सरकारही इंधनदरवाढीच्या मुद्यावर गंभीर दिसत नाही. विविध सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांनी आता इंधन दरवाढी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कच्च्या तेलाचे दर इतके कमी झाले असताना सरकारला त्याचा प्रचंड नफा झाला. तरीही जनतेला त्याचा फायदा मिळवून देण्यापेक्षा त्यांच्यावरच ओझे टाकले जात असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढताच देशांतर्गत बाजारातही इंधनाचे दर वाढतात. परंतु, कच्च्या तेल्याच्या किमतीत घट झाल्यानंतर मात्र स्थानिक बाजारात इंधनाचे दर कमी होत नाहीत. उलट केंद्र सरकार व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचे कर लावून इंधनाच्या दरांवर अधिभार लावला जातो. त्याचा थेट परिणाम महागाईवर होत असून त्यामुळे सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले जात आहे. मात्र, राज्य सरकारकडूनही कोणतेही पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे राज्यात महागाईचा भडका उडत असताना राज्य सरकारला केव्हा जाग येणार? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
पॉईंटर-
पेट्रोल डिझेलचे दर (प्रति लीटर)
जानेवारी २०१७
पेट्रोल- ००.०० डिझेल - ००.००
एप्रिल २०१८
पेट्रोल-८१.९५ डिझेल - ६८.९
जानेवारी २०१९
पेट्रोल- ७४.८६ डिझेल ६५.०९
जानेवारी २०२०
पेट्रोल- ८१.३२ डिझेल - ७०.७४
जानेवारी २०२१
पेट्रोल-९१.७६ डिझेल - ८०.८१
कोट-१
पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे शासनाने पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रित करावेत. अन्यथा छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरून तीव्र स्वरुपाचे आदोलन करणार आहे.
- करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतीवीर सेना
कोट-२
पेट्रोल डिझेल महागल्याने महागाई वाढत आहे. मात्र, सरकारकडून पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात संताप असून छत्रपती युवा सेना रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांचा संताप व्यक्त करेल.
-गणेश कदम, संस्थापक अध्यक्ष , छत्रपती युवा सेना, नाशिक
कोट-३
गेल्या पाच वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढच होत आहे. परंतु, राज्यकर्त्यांना त्याचे काहीच देणे-घेणे उरले नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनसामान्यांनी एकत्र येऊन आंदोलनात्मक लढा उभारण्याची गरज आहे.
- नितीन रोठे, संभाजी ब्रिगेड , जिल्हा सचिव,
कोट- ४
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे भाजीपाला आणि किराणा मालाचेही भाव वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे स्वयंपाकगृहाचे बजेटही कोलमडले असून कोरोना काळात उत्पन्न घटलेले असताना घर चालविताना कसरत करावी लागत आहे.
-अंजली पवार, गृहिणी.
कोट-५
इंधन दरवाढीमुळे घरखर्चासोबतच प्रवास खर्चही वाढला आहे. त्यामुळे घर सांभाळून उद्योग व्यवसाय अथवा नोकरी करणाऱ्या महिलांची कसरत होत आहे. शासनाने पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात आणायला हवेत.-
पूजा जाधव, गृहिणी
दर वाढल्याने बाजारपेठेवर परिणाम
इन्फो-१
पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे बाजारपेठेवर परिमाम झाला असून ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालक, मालवाहू वाहनधारक आणि कृषिमालाची ने-आण करणारे वाहनचालक अडचणीत सापडले आहेत.
इन्फो-२
खरीप पिकांची काढणी पूर्णपणे झाली असून शेतकरी कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी माल आणत आहेत. मात्र, डिसेलचे दर वाढल्याने वाहनभाडे वाढल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्याचप्रमाणे मालवाहतुकीचे भाडेही वाढल्याने महागाईत भर पडली आहे.