पेट्रोलचे भाव... अब की बार सौ के पार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:44 PM2021-02-27T18:44:29+5:302021-02-27T18:47:41+5:30
नाशिक- पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून ही आता प्रती लिटरचे दर शंभराकडे पेाहोचत आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोलचे भाव शंभरी पार करणार असल्याने नाशिकमध्ये एनएसयुआयच्या वतीने अब की बार सौ के पार असे लिहीलेला केक कापून आज अभिनव आंदोलन करण्यात आले.

पेट्रोलचे दर आता ९७ रूपये २५ पैशांपर्यंत पोहोचले आहे तर स्पीड पेट्रोलचे शंभर रूपयांवर पोहाेचले आहेत. या दरवाढीमुळे सर्व सामान्य नागरीकांना आता वाहन चालवणे कठीण झाले असून त्या मुळेच पेट्रोलच्या दरवाढी कडे सकारात्मक बघा असे सांगणारे उपरोधीक आंदोलन नाशिकरोड येथे खान पेट्रोल पंपावर करण्यात आले. केकवर शंभराचा आकडा लिहून त्यावर अब की बार सौ के पार असा संदेश देण्यात आला होता आणि त्या खाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे किक्रेट खेळतानाचे तसेच शतक झळकावल्यानंतर बॅट उंचावून अभिवादन करतानाची चित्रे देखील लावण्यात आली होती. पेट्रोल पंपावर केक कापल्यानंतर तो याच ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरीकांना देण्यात आला आणि पेट्रोलच्या चढत्या दरांमुळे महागाई कशी वाढते आहे, याविषयी माहिती देण्यात आली. तसेच केंद्र सरकारला पेट्रोलची शंभरी पार करण्यासाठी चिअर अप करण्यात आले.
एनएसआयुआयचे जिल्हाध्यक्ष अल्तमश शेख, ओमकार गोडसे, आकाश गावडी, पंकज पवार, हितेश डोईफोडे, तन्नू शेख, विशाल जाधव,रोशन उज्जैनवाल, अनिकेत जाधव, अजिज शेख यांच्यास अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.