शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पीएफ खाती सील

By admin | Published: December 22, 2015 12:25 AM

धुळे, जळगाव मनपा : भविष्य निर्वाह निधी भरण्यास हलगर्जीपणा

 सातपूर : वारंवार संधी देऊनही रोजंदारी आणि कंत्राटी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या धुळे, जळगाव, नंदुरबार व चाळीसगाव या नगरपालिका आणि महानगरपालिकांची बँक खाती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सील केल्याची माहिती निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली.नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार व चाळीसगाव या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये रोजंदारीवर व कंत्राटी कामगार काम करतात. मात्र या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी वेळच्या वेळी भरणे गरजेचे असताना तो भरण्यात आला नाही. म्हणून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने या नगरपालिका आणि महानगरपालिकांना दप्तर सादर करण्यास सांगितले होते. याबाबत वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कारवाईची तंबी दिल्यानंतर अखेर दप्तर सादर करण्यात आले. या दप्तरावरून तेथील रोजंदारीवर व कंत्राटीवर काम करणाऱ्या कामगार रक्कम निश्चित करण्यात आली. सदर रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करण्यासाठी पुन्हा तगादा लावावा लागला, वेळोवेळी संधीही देण्यात आली. अखेर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला नियमाप्रमाणे या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांची बँक खाती सील करण्याची कायदेशीर कारवाई नाईलाजाने करावी लागल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली. (वार्ताहर)