नाशिक : विद्यार्थ्यांच्या सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांमधून साकारलेल्या विविध विज्ञान प्रकल्पांच्या प्रदर्शनातून नवनवीन वैज्ञानिक आविष्कारांचे नाशिकरांना दर्शन घडले. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव अजित टक्के यांच्या हस्ते प्रदर्शनाचे सोमवारी उद्घाटन झाले. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिकांचे यावेळी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. दैनंदिन जीवनातील बाबी लक्षात घेत विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या गृहितकांवर आधारित प्रकल्प या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडले आहेत. यात जर्मिनेशन अँड ग्रोइंग प्लांट, एयर कूलर, हायड्रॉलिक पंप, सोलर पंप, सेक्युरिटी सिस्टीम, हायड्रॉलिक रोबोनिट्स आर्म, फन विथ केमेस्ट्री, स्मार्ट फार्मिंग रोव्हर, वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लांट, बायो इलेक्ट्रिसिटी, टेसला कॉइल, नॉन न्युटोनिअन फ्लुइड अशा जवळपास ३० प्रकल्पांच्या प्रतिकृतींचा समावेश दरम्यान, अजित टक्के यांनी या विज्ञान प्रयोगांचे परीक्षण करून निकाल जाहीर केले, दोन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकल्पासाठी पारितोषिके देण्यात आली. सूत्रसंचालन श्रद्धा माळोदे आणि निलांबरी नेहेते यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून वैज्ञानिक आविष्कारांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:27 AM