आडगाव : परिसरातील नागरिकाने पोलीस स्टेशनला फोन करायचा म्हणून गुगल ब्राउजरने नाशिक पोलीस डॉट कॉम या वेबसाइटवरील आडगाव पोलीस स्टेशनच्या पेजवर जाऊन संपर्क केला असता फोन पोलीस स्टेशनला न लागता खासगी हॉस्पिटलला लागल्याने अडचण निर्माण झाली. त्यामुळे वेबसाइटवरील नंबरची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उच्च न्यायालयाने सर्व शहर, जिल्हा पोलीस मुख्यालयांची वेबसाइट असली पाहिजे, असे आदेशच दिले आहेत. या आदेशानुसार पोलीस स्टेशनच्या मुख्यालयांची वेबसाइट बनवून घेण्यात आली असली तरी या वेबसाइटवरील माहिती वेळोवेळी अपडेट होताना दिसत नसल्याची धक्कादायक बाब या प्रकारामुळे समोर येत आहे. त्यामुळे वेबसाइट बनवण्याबरोबरच वेबसाइट वेळोवेळी अपडेट ठेवण्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.नाशिक पोलीस डॉट या वेबसाइटवर आडगाव पोलीस स्टेशनचा नं. ०२५३-२५१३१३३ हा दिलेला आहे, पण आडगाव पोलीस स्टेशनचा नसून सदगुरू हॉस्पिटलचा आहे. आडगाव पोलीस स्टेशनचा नं. ०२५३-२९७०६३३ हा आहे याची नोंद घ्यावी.आज प्रत्येक जण स्मार्टचा वापर करतो. पोलिसांनी-देखील आॅनलाइन तक्र ारी करण्याचे आवाहन नागरिकांना केलेले आहे, पण वेबसाइटवरील माहिती चुकीची असेल, तर आॅनलाइन तक्र ारींची दखल घेतली जाईल का, हादेखील प्रश्न निर्माण होतो.- उमेश शिंदे, नागरिक
पोलीस स्टेशनऐवजी हॉस्पिटलला फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:30 AM