वणी : कोजागरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी तृतीय पंथीयांचे सप्तशृंगगडावर आगमन झाले असुन रविवारी छबिन्याची मिरवणुक हे प्रमुख आकर्षण असणार आहे. रविवारी गडावर कोजागिरी पौर्णिमेचा होत असतो. कावडधारक दर्शनार्थी भाविक व तृतीयपंथीय देवीभक्त यांच्या उपस्थितीत साजरा होणारा सोहळा पाहण्यासाठी देशभरातील भाविक हजेरी लावतात.या सर्व उत्सव मालिकेत प्रमुख आकर्षण असते ते तृतीयपंथीयांच्या छबिन्याचे. पौर्णिमेला शिवालय तलावात तृतीयपंथी स्नान करतात. नविन वस्त्र परिधान करु न विविध प्रकारचे दागदागीने घालतात, सुवर्णलंकारांचे सुशोभिकरण करतात. कुलदेवता देवींच्या मुर्ती गुरुंच्या फोटोचे पुजन, पुजाविधी मंत्रोच्चाराच्या साथीने करण्यात येतात. दरम्यान काही भाविक नवसपुर्तीसाठी समुहात सहभागी होतात. नवसपुर्तीसाठी भाविकांना शिवालय तलावात स्नान करावे लागते.त्यानंतर त्या भाविकांना जमिनीवर झोपविण्यात येते. कडुनिंबाच्या पानांचा प्रतिकात्मक वापर करु न पुजाविधी करण्यात येतो व नवसाच्या स्वरु पाचा उल्लेख करु न कुलदेवीला व देवताना साकडे घालण्यात येते. नवसपुर्ती झाल्यानंतर पुढील वर्षी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द घेण्यात येतो दरम्यान दुपारच्या सुमारास कुलदेवीचा फोटो चांदीची मुर्ती सुशोभित छबिन्यात ठेवण्यात येते. काही तृतीयपंथी सुशाभित टोपलीत गुरु ंचा फोटो देवीच्या मुर्ती ठेवतात. गडावरील सर्व भागातुन छबिन्याची मिरवणुक पहिल्या पायरीपर्यंत नेण्यात येते. त्यापुर्वी ठिकठिकाणी तृतीयपंथी नृत्य करतात. काही भाविकही यात सामील होतात. ही मिरवणुक पहिल्या पायरीपर्यंत पोहचल्यानंतर कुलदेवी व सप्तशृंगी देवीची भेट होते. निंब नेसवणे पुजाविधी पार पाडल्यानंतर सप्तशृंगीचे दर्शन करण्यात येते. परतल्यानंतर मान्यता व परंपरेनुसार विधी पार पाडण्यात येऊन दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु होतो. विशेष म्हणजे वर्षातुन एकदाच हा छबिना गुरु आज्ञेनुसार बाहेर काढण्यात येतो व नंतर गुरूंंच्या आदेशानुसार निश्चित ठिकाणी ठेवण्यात येतो.
सप्तश्रृंगगडावर उद्या छबिन्याची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 2:55 PM