केंद्र व राज्य शासनाने गोहत्या बंदी घातली असली तरी सर्रास त्याची छुप्या पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचे या घटनेच्या निमित्ताने उघडकीस आले. याबाबत गो संरक्षक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी रात्री सुमारे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास पिकअप (क्रमांक एम एच ०३- ही पी-३३९७) हे वाहन छुप्या पद्धतीने तीन ते चार टन गोमांस घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना बोरटेंभा शिवारात टेम्पोचे मागील चाकाचे एक्सेल तुटले. त्यामुळे चाक निखळून टेम्पो एका शेतात उलटला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र वाहन चालक फरार झाला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गोमांस भरलेली पिकअप शेतातून बाहेर काढण्यासाठी दोन क्रेनचा वापर करण्यात आला. यावेळी वाहतूक काही काळ बंद केल्याने दोन्ही बाजूने एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान इगतपुरी पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून टेम्पो चालकांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, एस. के. शिंदे, पोलीस हवालदार मुकेश माहिरे, देसले आदी करीत आहेत.
इन्फो
वर भाजीपाला, आत गोमांस
गोहत्या बंदी असतानाही सर्रासपणे गोमांसाची छुप्या पद्धतीने वाहतूक करून त्याची विक्री सुरू आहे. प्रामुख्याने मालेगाव, चाळीसगांव, संगमनेर, नाशिक अशा अनेक भागातून हे मांस मुंबईकडे पाठविले जाते. महामार्गावर अनेकदा पोलिसांची नाकाबंदी असतानाही अशी वाहने त्यांच्या नजरेतून सुटतात कशी, असा सवाल गोरक्षकांनी केला आहे. याबाबत काटेकाेर तपासणी मोहीम राबविण्याची मागणीही गोरक्षकांनी केली आहे. सदर वाहनात गोमांस झाकण्यासाठी वर भाजीपाला रचण्यात आला होता. गाडीला अपघात झाल्याने सदर घटना लक्षात आली. अन्यथा हा टेम्पो इप्सित स्थळी पोहोचला असता.
फोटो- २० इगतपुरी ॲक्सिडेंट
बोरटेंभे परिसरात गोमांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोला झालेला अपघात.
===Photopath===
200621\20nsk_14_20062021_13.jpg
===Caption===
फोटो- २० इगतपुरी ॲक्सीडेंटबोरटेंभे परिसरात गोमांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोला झालेला अपघात.