देवळाली कॅम्प : श्री रेणुका माता मंदिरासमोरील फरचंदीबागेत लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याचा बछडा जेरबंद झाला.भगूर देवी मंदिरासमोरील स्नेहनगर येथे राहणारे माजी लष्करी अधिकारी उपाध्ये यांच्या बंगल्याच्या आवारातून गेल्या सोमवारी रात्री बिबट्याने पाळीव कुत्र्याला पळवून नेले.गेल्या आठवड्यापासून फरचंदीबागेच्या परिसरात राहणाºया रहिवाशांना अनेकवेळा बिबट्या व त्याच्या बछड्यांचे दर्शन झाले होते. बिबट्याने पाळीव कुत्र्याला पळवून नेल्यानंतर फरचंदीबागेच्या आवारात वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजºयात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बिबट्याचा बछडा अडकल्याचे कामगार वाल्मीक गबिल यांच्या लक्षात आले.शनिवारी सकाळी परिसरात बिबट्याचा बछडा पिंजºयात कैद झाल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सदर घटनेची माहिती वनविभागाला समजताच वनाधिकारी राजेंद्र ठाकरे व कर्मचारी फरचंदीबागेत दाखल होऊन पिंजºयात कैद झालेल्या बछड्याला पिंजºयासह घेऊन गेले.ग्रामस्थांमध्ये भीतीलोहशिंगवे येथील निवृत्ती जुंद्रे यांच्या मळ्यात गुरुवारी पहाटे दोघा गायींवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक गाय ठार झाली, तर दुसºया गायीला बिबट्यासोबत घेऊन गेला. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री सुनील चौधरी यांच्या घराजवळील गोठ्यात असलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचा बछडा झाला पिंजराबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:41 AM