त्र्यंबकेश्वर : चारधाम यात्रेसाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील ३५ यात्रेकरूंकडे कोरोना चाचणीचा अहवाल आणि लस घेतल्याचे प्रमाणपत्र असतानाही उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे अडवून ठेवल्याची घटना समोर आली आहे. खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या पाठपुराव्यानंतर या भाविकांची अखेर सुटका करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील ३५ भाविक चारधाम यात्रेसाठी गेले होते. त्यांनी सोबत कोरोनाचा आरटीपीसीआर रिपोर्ट व सिंगल व्हॅक्सिन सर्टिफिकेट सोबत ठेवले होते. तरी देखील त्यांना उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग येथे अडविण्यात आले व त्यांची पुन्हा बळजबरीने अँटिजन टेस्ट केली गेली. यात ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले परंतु एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. सदर व्यक्तीची पुनश्च आरटीपीसीआर चाचणी केली असता तेव्हा ती निगेटिव्ह आली. तरीदेखील या सर्व भाविकांना क्वारंटाईन करत १४ दिवस डांबून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अडकलेल्या काही भाविकांनी सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. सचिन लोंढे यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांना फोन आला व अडकलेल्या भाविकांपैकी गितांजली गाजरे यांनी कडलग यांच्याशी व्हिडिओ काॅन्फरन्स काॅल संवाद साधला व मदतीची याचना केली. पुरुषोत्तम कडलग यांनी ताबडतोब खासदार हेमंत गोडसे यांना फोन करत घडलेला प्रकार कथन केला. गोडसे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांपासून थेट वरिष्ठ पातळीवर संपर्क केल्यानंतर अखेर या भाविकांची सुटका करण्यात आली.
इन्फो
या भाविकांची झाली सुटका
अडकलेल्या भाविकांमध्ये प्रीतम पवार, धर्मेंद्र उपाध्याय, निशा उपाध्याय, सचिन जाधव, गीतांजली गाजरे (जाधव), मोहिनी गाजरे, किरण धनक, सुनीता धनक, मुनीलाल कनोजिया, शकुंतला कनोजिया, कुसुम चितोडीया, अरुणा काळे, रतन गवळी, रंजना करंकाळ, तुषार पाटील, नेहा पाटील, संध्या वानखेडे, ललिता खरे, आरोही वानखेडे, उमेश सांगळे, मीना शिंदे, गोपीनाथ उतेकर, सुषमा हिंडलेकर, निहार बनसोडे, शशिकला बनसोडे, प्रदीप बनसोडे, सुनीता उतेकर, हेमा माखवा, नथू पाटील, आशा पाटील, त्रिंबक सावळे, दुर्गा सावळे व रंजना पाटील यांचा समावेश होता.