नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर आॅनलाइन व्यवहारांवर भर देण्यासाठी ज्या काही उपाययोजना शासकीय व बॅँकिंग पातळीवर करण्यात आल्या, त्याचा आधार घेऊन आॅनलाइन व्यवहारात केरळ राज्यातील कोटायनपाठोपाठ नाशिकने अव्वल क्रमांक मिळविला आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडिया या संस्थेने केलेल्या पाहणीतून हे स्पष्ट झाल्यामुळे नजीकच्या काळात नाशिक शहरात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे.त्यामुळे आता नाशिक शहरात डिजिटल पेमेंटला अधिक वाव असल्याचे पाहून विविध व्यापारी संघटनांच्या मदतीने त्यांना ‘क्युआर कोड’मोफत देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यासाठी ५ ते ७ फेब्रुवारी याकाळात नाशिक शहरात डीजिटल मेळावा घेण्यात येणार असून, त्यात सहभागी होणाºया सर्व व्यापारी संघटना व प्रतिनिधींना क्युआर कोड देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांकडे भीम अॅप असेल त्यांना या क्युआर कोडचा अधिक उपयोग होणार असून, दोन हजार रुपयांपर्यंतच्या कोणत्याही खरेदीवर शुल्क न आकारण्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीस निवासी उप जिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार चंद्रकांत देशमुख यांच्यासह शहरातील सर्व व्यापारी संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
पायलट प्रोजेक्ट : बैठकीत सादरीकरण डिजिटल व्यवहारात नाशिक देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:46 AM
नाशिक : नोटाबंदी जाहीर केल्यानंतर आॅनलाइन व्यवहारांवर भर देण्यासाठी ज्या उपाययोजना शासकीय व बॅँकिंग पातळीवर करण्यात आल्या, त्याचा आधार घेऊन आॅनलाइन व्यवहारात केरळ राज्यातील कोटायनपाठोपाठ नाशिकने अव्वल क्रमांक मिळविला आहे.
ठळक मुद्दे प्रोत्साहन देण्यासाठी पायलट प्रोजेक्टक्युआर कोडचा अधिक उपयोग