पिंपळगाव बसवंत : येथील परिसरात मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा व शहरात मोकाट गाईमुळे होणार्या वाहनांची गर्दी व अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे बुधवारी एका अज्ञात व्यक्तीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला सातत्याने अशा घटना पिंपळगाव शहरात घडत आहे तसेच मोकाट कुत्र्यांनी एका बालकास ठार मारल्याची घटना देखील पिंपळगाव शहरात घडली आहे तरीदेखील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेमोकाट जनावरं बाबत पिंपळगाव बसवंत हैराण झाले होते आ िणत्यात आता भटक्या कुत्र्यांची देखील वाढ झालेली आहे त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत या मोकाट जनावरांचा व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी सातत्याने होत आहे. वाहनचालकांच्या मागे ही भटकी कुत्री व मोकाट जनावरांकडून हल्ला केला जातो.रात्रीच्या वेळी घोडके नगर,शिवाजीनगर,मोरेनगर व अंबिका नगर परिसरात ही भटकी कुत्री मोठ्या संख्येने आढळतात रस्त्याने जाणारे दुचाकीचालक नागरिक यांच्या अंगावर धावून जातात.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.नाशिक सारख्या शहरातील भटकी कुत्री महापालिकेचे कर्मचारी येथील परिसरात आणून सोडल्याचे संशय येत आहे असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत पिंपळगाव शहरांमध्ये वाढ होत आहे नागरिकांच्या सुरक्षेचा व स्वच्छतेचा विचार करून भटकी कुत्री व मोकाट जनावरे यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायत कधी निर्णय घेईल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहेत.
पिंपळगाव बसवंतला भटक्या कुत्रांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 6:27 PM