नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केटीएचएम अभ्यासकेंद्राची विद्यार्थिनी काजल बोरस्ते शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना एक विचार या विषयावर विचार मांडून मविप्र अखिल भारतीय करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांकाची विजेती ठरली, तिला 25 हजार रु पये रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंतच्या शुभांगी ढोमसे व सोनाली जगदाळे यांनी त्यांच्या महाविद्यालयाला मविप्र करंडक मिळवून दिला. एचपीटी महाविद्यालयाचा अमोल गुट्टे याने द्वितीय क्र मांक मिळविला.रावसाहेब थोरात सभागृहात शानिवारी (दि.3) मविप्र करंडक स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सरचिटणीस निलीमा पवार यांच्यासह प्रमुख पाहूणो व्यासपीठावर महात्मा गांधी विद्यापीठ मॉरीशसचे मराठी विभागप्रमुख डॉ.बिदन आबा,उपसभापती राघो अहिरे, चिटणीस डॉ.सुनिल ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे,डॉ.प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, पद्माकर पाटील, धनंजय धनवटे, रंजना पाटील, कैलास सोनवणो, प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड, डॉ.पुरु षोत्तम काळे, प्रा.अजित जाचक, प्रा.मुल्तजीब खान,डॉ.डी.डी.काजळे, सी.डी.शिंदे उपस्थित होते. डॉ.बिदन आबा यांनी मॉरीशस मध्येही मराठी भाषिक मोठय़ा प्रमाणात असून प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मराठी भाषाही शिकविण्यात येत असून तेथेही वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. निलीमा पवार यांनी अध्यक्षीय मनोगतात ग्रामीण भागातील विद्याथ्र्यानी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग वाढवुन नेतृत्वगुणांचा विकास करावा असे आवाहन केले. प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी विजेत्यांची घोषणा केली. सुत्रसंचलन प्रा.तुषार पाटील व विद्यापीठ प्रतिनिधी ओंकार रोकडे यांनी केले.
मविप्र करंडक स्पर्धेतील विजेतेमविप्र करंडक स्पर्धेत काजल बोरस्ते हिने प्रथम क्रमांक पटकावला असून अमोल गुट्टे-द्वितीय तर चीत्ततोष खांडेकर यांनी तिसरा क्रमांक मिळवाला आहे. या स्पर्धेत जयंतकुमार काटकर , हर्षद औटे, यशश्री देवरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.