प्रवासी नाराज: पार्सल आॅफिस बंद,तक्रारपेटीची दुरवस्थापिंपळगाव बसवंत:येथील बसस्थानकपरिसरातविविध समस्याकायम असताना येथेकाहीगुंडांचासर्रासवावरहोतआहे.काहीठिकाणीप्रेमीयुगलांचाअडडाझालाआहे.यामुळेप्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.गेल्या काहीदिवसापासून प्रवाशांनासूचनाकरण्याचा माईक बंदआहे तक्र ार करणारी पेटी तुटलेली आहे.या बसस्थानकावर गाजावाजा करत लावण्यात सीसीटीव्ही यंत्रणा ही चुकीच्या ठिकाणी असल्याने त्याचा उपयोग होत नाही. जुन्या पास केंद्र व पार्सल आॅफिसजवळ असलेल्या बोळीमध्ये तरु ण तरु णीचा वावर वाढताना दिसत आहे. नाशिक फलाटाच्या शेजारी असलेले पार्सल आॅफिस बंद झाल्यावरयेथे तळीरामांचा अड्डाझाला आहे. यामुळे पार्सल कर्मचारीला सकाळी दारूच्या बाटल्या संकलित करून दिवसाची सुरु वात करावी लागत आहे. या बोळीत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणी होत आहे.बसस्थानकातील पास केंद्र एका बोळीत होते ते आता वणी निफाड फलाटजवळ नव्याने सुरू केले आहे. यामुळष जुन्या पास केंद्राच्या बोळीत नेहमी प्रेमीयुगुलांचा वावर बघावयास मिळतो. तरु ण-तरु णींचा े या परिसरातील वावर प्रवाशांना खटकतो. प्रवासी या परिसरातून जातात तरीही ही प्रेमीयुगल जागचे उठत नाहीत. त्यांच्या धुंदीत त्यांना आजुबाजूचा परिसर जणू दिसतच नाही.प्रेमीयुगलांचा येथील वावर हा गुन्हेगारीकडे वळत आहे. या पूर्वी येथील शांतता भंग होण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. तरीही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही अशी येथील नागरिकांची तक्रार आहे.येत्रे टवाळखोरांची गुंडगिरी वाढल्याने विद्यार्थिनींची छेडछाड केली जाते. टवाळखोरांकडून बस स्थानकात विद्यार्थीनीच्या छेडछाडीवरून हाणामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे.नुकतेच काही अज्ञात टवाळखोरांनी मोबाईल मध्ये मुलींचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला यामुळे वाद झाले होते.महाविद्यालयिन व शालेय विद्यार्थिनींनी छेड काढणे,तसेच एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे,धूम स्टाईलने गाड्या चालवणे असे प्रकार नेहमी घडत आहे.तरीही हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.