पिंपळगाव बसवंत : देशभरात कोरोनाची लागण होऊन दुसरा टप्पा सुरू झाल्याने प्रशासन व नागरिक यांच्यात कोरोना विषाणूबाबत मोठी दहशत निर्माण झाली आहे. पिंपळगाव बसवंत शहरात परदेशातून, परराज्यातून तसेच मोठ्या शहरातून येणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. आत्तापर्यंत पिंपळगाव बसवंत येथे ३११ जणांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून या नागरिकांना १४ दिवस होम क्वॉरण्टाइनचा सल्ला देण्यात आला आहे.कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून, दिवसेंदिवस राज्यात रु ग्णांचा आकडा वाढत आहे व परराज्यातून, परदेशातून व मोठ्या शहरातून आलेल्याची संख्यादेखील वाढत आहे. पिंपळगाव शहरात परदेशातून आतापर्यंत ८ नागरिक, तर परराज्यातून १५ तसेच मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरांतून आलेले २८८ नागरिक आहेत. यांची नोंद स्थानिक प्रशासनाने ठेवून या ३११ नागरिकांना होम क्वॉरण्टाइन केले असल्याची माहिती पिंपळगाव प्राथमिक रुग्णालयातील शिरन मांदे यांनी दिली.
पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बाहेरून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३११ वर पोहोचली आहे. त्यामुळे अशा नागरिकांना शोधून प्राथमिक आरोग्य केंद्राने होम क्वॉरण्टाइन केले आहे. त्यांच्यात कोणताही विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने या सर्वांच्या हातावर शिक्का मारून १४ दिवसांपर्यंत होम क्वॉरण्ंटाइन होण्यास सांगितले आहे. शिक्का मारलेल्या नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे.आपल्या घरी असणारी आपले मुलं-मुली घरातील ज्येष्ठ नागरिक तसेच नातेवाईक यांनी या व्यक्तीपासून दूर राहावे तसेच आपले कपडे व इतर उपयोगी साहित्य हे घरातील इतरांपासून वेगळे ठेवावे. तोंडाला रु माल बांधावा. हात नेहमी स्वच्छ धुवावे तसेच सर्दी-खोकला-ताप यासारखे लक्षण आढळून आल्यास दुर्लक्ष करू नये. तसे आढळल्यास तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी चेतन काळे यांनी केले आहे.
परदेशातून, परराज्य तसेच मोठ्या शहरांतून दाखल झालेल्या नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. १४ दिवस घरायच राहण्याचे आदेश देण्यात आले असतानाही लॉकडाउन व कायद्याचे उल्लघंन करून घराबाहेर फिरणाºया चार होम क्वॉरण्टाइन नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, परिचारिका, कर्मचारी वर्ग तसेच केंद्रांतर्गत येणाºया उपकेंद्रातील परिचारिका, आशासेविका या सर्वांना कोरोना संसर्गजन्य रोगाच्या संदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. नागरिकांनी सतर्कराहून घराच्या बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. - चेतन काळे, आरोग्य अधिकारी
क्वॉरण्टाइन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच थांबून आपले व आपल्या परिवार तसेच परिसराची सुरक्षितता ठेवावी. घराबाहेर पडणाºया नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.- कुणाल सपकाळे, सहायक पोलीस निरीक्षक