पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर तसेच माथाडी कामगार प्रतिनिधी नारायण पोट, दीपक दौंडकर, व्यापारी प्रतिनिधी सोहन भंडारी, शंकर ठक्कर आदिंनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाला अडचण होऊ नये म्हणून माथाडींच्या ज्या अडचणी असतील त्या आपल्या स्तरावर मिटवाव्यात. शेतकरी वर्गाला कुठलीही अडचण होता कामा नये, असे आवाहन सभापतींनी केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत व्यापारी व माथाडी कामगारांनी याकामी समन्वय साधत कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय घेतल्याने शेतकरी, माथाडी कामगार, व्यापारी आदिंनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा कांदा लिलाव सुरू
By admin | Published: October 18, 2016 1:36 AM