पिंपळगाव बसवंत : प्रेमाच्या नावाखाली चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांची संख्या सर्वत्र वाढत असल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्याकरिता साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले असून, अशा शौकिनांना गजाआड केले जाणार आहे. त्याकरिता पिंपळगाव बसवंत शहर परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ह्यप्रेम करा, पण जपूनह्ण असा सल्ला देत शांतता भंग करणारे कुणीही असो, त्यांना गजाआड केले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.शहरातील कॅफेत अश्लील चाळे केले जातात, याची गुप्त माहिती मिळाल्याने शहरातील कॅफे चालकांना नोटिसा देण्यात आल्या व कधी नव्हे ते चक्क गणवेशातील पोलिसांसह साध्या वेशातील पोलीसही शहरात गस्त घालताना दिसू लागले. त्यामुळे प्रेम करा मात्र पोलिसांपासून सावधान असा इशारा देण्यात आला आहे.मिनी दुबई व व्यापारी शहर व तालुक्यातील सर्वात मोठे महाविद्यालय असल्याने अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांना व महाविद्यालयीन तरुण- तरुणींना आकर्षित करण्यासाठी विविध दुकाने थाटली आहेत. यामध्ये कॅफेचादेखील समावेश आहे व येथील कॅफे बदनामीच्या फेऱ्यात आहे. कारण युवक-युवतींना एकांत मिळावा, यासाठी कॅफेमध्ये विशिष्ट सोय केली आहे. कॅफेत युवक व युवती एकत्रित किती वेळ घालवणार, त्यावर तेथील बिल ठरते. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कॅफे चालकांना बोलावून नोटिसा बजावल्या. आता कॅफेवरही पोलिसांची करडी नजर राहणार असल्याने कॅफे चालकाचे ढाबे दणाणले आहे.प्रेमाच्या नावाखाली उघड्यावर युगुलांचा चाळा सुरू असल्याचे दृश्य बहुतांश कॅफे व बसस्थानकात दिसते. त्यामुळे कॅफेत कुटुंबासह जाणेही मुश्कील झाले आहे. शिवाय कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस अधिक सज्ज झाले आहेत.शहरात गस्त वाढवण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.कॅफे अथवा हॉटेलमध्ये बसून तरुण-तरुणी बोलत असेल तर त्यास आक्षेप असण्याचेही कारण नाही, मात्र, त्याआड चालणारे चाळे मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. शांतता भंग करणारे कुणीही असो, त्यांना गजाआड केले जाईल.- भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक, पिंपळगाव बसवंतअशी आहे पोलिसांची नोटीसकॅफेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. या सीसीटीव्ही फुटेजचा कालावधी एक वर्षे असावा. तसेच सीसीटीव्ही बसवताना कॅफेमधील सर्व टेबल त्यात आले पाहिजे अशा पद्धतीने लावावे, कॅफेमध्ये येणारे व जाणारे यांचे नाव मोबाइल नंबर व पासपोर्ट साइज फोटो रजिस्टरला लावावे, कॅफेमध्ये अल्पवयीन मुलं-मुली येणार नाही व एकत्र बसणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. आपल्या कॅफेमध्ये अचानक भेट दिल्यावर काही आक्षेपार्ह आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस कॅफे चालकांना देण्यात आली आहे.(१५ पिंपळगाव)
पिंपळगाव बसवंत पोलिसांचा कॅफेवर तिसरा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:10 AM
पिंपळगाव बसवंत : प्रेमाच्या नावाखाली चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांची संख्या सर्वत्र वाढत असल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्याकरिता साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले असून, अशा शौकिनांना गजाआड केले जाणार आहे. त्याकरिता पिंपळगाव बसवंत शहर परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ह्यप्रेम करा, पण जपूनह्ण असा सल्ला देत शांतता भंग करणारे कुणीही असो, त्यांना गजाआड केले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ठळक मुद्देनोटिसा बजावल्या : शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश