ठळक मुद्देपोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना निवेदन देण्यात आले.
पिंपळगाव (बसवंत): सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव बसवंत शहरात समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.सकाळी साडे दहा वाजता मराठा समाजाच्यावतीने मुंबई -आग्रा महामार्गावरील चिंचखेड चौफुली परिसरात रास्ता रोको केला. सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना निवेदन देण्यात आले.