ओझरटाऊनशिप : जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनच्या (सॅल्युट टु सायलेंट वर्कर्स) या कार्यक्र मा निमित्त जेसीआय तर्फे हॉटेल करी लिवज,पिंपळगाव येथे कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी करणाºया शेतकऱ्यांना सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न, पॉलिहाऊस फुल शेती, द्राक्ष शेतीत निर्यात, महिला शेतकर्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्र मासाठी प्रमुख पाहूणे म्हणून आंतर राष्ट्रीय व्याख्याते डाँ.झाकीर हुसेन होते. अध्यक्षस्थानी डाँ.सुधीर भांबर होते. या प्रसंगी महिला शेतीमित्र पुरस्कार रागिनी आगळे राणी गणोरे यांना युवा शेतीमित्र पुरस्कार माणिक शिंदे पोपटराव गवळी,साहेबराव गोवर्धने यांना तांत्रिक शेती पुरस्कार कृष्णा हांडगे व सेंद्रिय शेती पुरस्कार संजय पवार यांना देऊन जे सी आय या संस्थेचे इंटरनेशनल ट्रेनर झाकीर हुसेन यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी जेसीआय ग्रेप टाऊनचे सुधाकर कापडी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष केशव बनकर, संतोष शिरसाठ, विकास आथरे यांनी म्हणून काम पाहिले.
पिंपळगाव जेसीआयतर्फे शेतकऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 3:41 PM