बाजार आवारात आल्यानंतर शेतकऱ्यांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यात शेतकरी बांधवांनी प्रथम आरटीपीसीआर किंवा रॅपिड चाचणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर टोकन घेऊनच कांदा विक्रीसाठी आणावयाचा आहे. बाजार आवारात वाहनासोबत फक्त दोन व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे तसेच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचा दाखला बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दाखवून प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय बाजार समितीतील कर्मचारी, व्यापारी, मापारी, हमाल, कामगार यांनादेखील रॅपिड चाचणी बंधनकारक केली आहे. अहवाल नसेल तर बाजार समितीच्या आवारात प्रेवश नाकारला जाईल असे स्पष्ट निर्देश बजार समितीने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दखल घ्यावी व कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपळगाव बाजार समिती सोमवारपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:13 AM