शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

पिंपळगाव बाजारात टमाट्याला लाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:36 AM

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याला ४० रुपये किलो भाव मिळाला. बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात टमाटा हंगाम सुरू होतो, हंगामाच्या सुरुवातीलाच टमाट्याला ४० ते ४५ रुपये भाव मिळत आहे.

ठळक मुद्देभाव तेजीत : ४० रुपये किलो, पावसामुळे तडे गेल्याने शेतकरी चिंतित

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याला ४० रुपये किलो भाव मिळाला. बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात टमाटा हंगाम सुरू होतो, हंगामाच्या सुरुवातीलाच टमाट्याला ४० ते ४५ रुपये भाव मिळत आहे.मागील वर्षी दहा ते पंधरा हजार कॅरेट टमाटा रोज बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत होता; मात्र यावर्षी गेल्या आठवड्यात सतत पाऊस पडत राहिल्याने टमाट्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी रोज सरासरी ७०० ते ८०० कॅरेट माल विक्र ीस येत असून, प्रत्येकी २० किलो कॅरेटला ८०० ते ९०० रुपये दर मिळत आहे.पावसामुळे नुकसानसध्या जरी टमाट्याला चांगला भाव मिळत असला तरी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. झाडावरील फुलकळी गळली गेली तसेच काढणीला आलेल्या मालाला तडे गेल्याने खराब झाला असून, आवक व पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे तेजी आली आहे.आमचे दोन एकर टमाटा पीक असून, जवळपास दोन लाख रुपये खर्च केला; मात्र पावसाचे प्रमाण खूप झाल्याने हातातोंडाशी आलेले टमाटे खराब झाले. आज जरी भाव चांगला असला तरी पण मालाचे खूप नुकसान झाल्याने जवळपास ७० टक्के मालाचे नुकसान झाले.- अण्णासाहेब कुशारे, नांदुर खुर्दआॅगस्ट महिन्यात मी रोज शंभर ते दीडशे कॅरेट माल विक्र ीसाठी आणत होतो. यावर्षी पावसाने नुकसान झाल्याने रोज वीस ते पंचवीस कॅरेट टमाटे विक्र ीस आणत आहे.- संतू जाधव, चिंचोले, ता. चांदवड