पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.१७) उन्हाळ कांद्याला चालू वर्षातील सर्वात उच्चांकी ७०५१ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळाला. शुक्र वारच्या (दि.१६) तुलनेत शनिवारी कांदा दर ५३९ रु पयांनी वधारल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.केंद्र सरकारकडून कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्यात बंदी केली. मात्र परराज्यात अतिवृष्टीमुळे कांद्याचे ४० टक्के नुकसान झाल्याने परिणामी कांदा आवक घटल्याने पिंपळगाव बाजार समितीत कांदा बाजारभाव ४५०० ते ७००० च्या दरम्यान स्थिर आहे. शिवाय बाजार समितीत आता लाल कांद्याची आवक होत हळू हळू वधारती असल्याने लाल कांद्याला किफायतशीर दर लाभत आहे.पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी उन्हाळ कांद्याची ४४९० क्विंटल आवक झाली. त्यास जास्तीत जास्त ७०९१ कमी २७०१ तर सरासरी ५६५१ रुपये दर मिळाला.
पिंपळगावी कांद्याला ७०५१ रुपये प्रति क्विटंल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 7:46 PM
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.१७) उन्हाळ कांद्याला चालू वर्षातील सर्वात उच्चांकी ७०५१ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळाला. शुक्र वारच्या (दि.१६) तुलनेत शनिवारी कांदा दर ५३९ रु पयांनी वधारल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देबाजार समितीत आता लाल कांद्याची आवक होत हळू हळू वधारती