पिंपळगाव बसवंत : गुन्हेगारी, अवैध धंदे, वाढती गुंडगिरी आशा कोणत्यानाकोणत्या कारणासाठी चर्चेत असलेल्या पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या चर्चेत नवीनच भर पडली आहे ते म्हणजे बंदोबस्तात लावण्यात येत असलेल्या बॅरिकेटची. शहरातील वणी चौफुलीवर दोन महिन्यांपासून एक विक्र ेता बॅरिकेटला प्लास्टीकचा पाल बांधून त्याचा वापर करत आहे, तर दुसरीकडे गणेश विसर्जनाच्या दिवशी कादवा नदीकाठी लावण्यात आलेले बॅरिकेटस् असल्याने आठ दिवस होऊनही बेवारस पडले असल्याने त्याची गावात सद्या चर्चा होत आहे.वाहतूक सुरळीत करण्यासाठी बॅरिकेट लावून नाकाबंदी केली जाते ते बॅरिकेट पिंपळगाव येथील वणी चौफुलीवर कोणत्याही बंदोबस्तात लावले नसून ते एक फळ विक्र ेता प्लॅस्टिकचा पाल बनवून त्याचा उपयोग करत आहे तर अनंतचतुर्दशीच्या दिवशी खबरदारीकरता कादवा नदीकाठी लावण्यात आलेले बॅरिकेट अद्याप तिथेच पडले असल्याने चित्र दिसत आहे.शहरात व परिसरात कुठलाही बंदोबस असो तेव्हा तातडीने त्याठिकाणी बॅरिकेट लावले जातात,परंतु बंदोबस्त संपल्यावर ते बॅरिकेट उचलण्याची तसदी पोलीस प्रशासन घेत नसल्याने ते बेवारस स्थितीत पडून असतात. त्यामुळे याची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे नंतर तेच बॅरीकेटस् सायीचे नव्हेत तर गैरसोयीचे ठरतात.(फोटो ०७ पिंपळगाव, २)
पिंपळगाव पोलिसांच्या बॅरिकेटस्चा विक्रेत्यांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 3:47 PM
पिंपळगाव बसवंत : गुन्हेगारी, अवैध धंदे, वाढती गुंडगिरी आशा कोणत्यानाकोणत्या कारणासाठी चर्चेत असलेल्या पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या चर्चेत नवीनच भर ...
ठळक मुद्देकादवा नदीवर बेवारस पडले बॅरिकेटस्.