पिंपळगाव बसवंत : शहरातून जाणारा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळच्या दरम्यान शहरातील चिंचखेड चौफुली परिसरात नाशिककडून धुळ्याकडे, धुळ्याकडून नाशिककडे व बाजार समितीकडून शहराकडे येणाऱ्या वाहनांची संख्या पहाता राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या जवळपासच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पिंपळगाव बसवंत शहरात दररोज पहावयास मिळते.शहरातील चिंचखेड चौफुली परिसरात उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू आहे.पण त्याच ठिकाणी असलेल्या व्यवसायिकांनी रस्त्याकडे अतिक्र मण केल्याने खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यात वाहने उभी करत असतात, त्यातच बाजारसमतिीकडून शहरात, व शहरातून जोपुळकडे तसेच नाशिकडून मालेगाव, व मालेगाहून नाशिकच्या दिशेने जाणार्या वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उदभवत आहे.वाहनधारकांकडून घाई गर्दीत लवकरात लवकर मार्गस्थ होण्यासाठी वाहतुकीच्या नियमांना फाटा देत विरु द्ध दिशेने वाहने नेली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.शुक्र वारी सायंकाळी पिंपळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गुरु कृपा संकुल ते ते थेट वणीचौफुली पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक मात्र चांगलेच बेजार झाले आहे.
पिंपळगावी वाहतुक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 3:07 PM