सदर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून येवला पंचायत समितीचे सभापती प्रविण गायकवाड उपस्थित होते. या मेळाव्याचे उद्घाटन सरपंच माणिकराव रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यात सभापती गायकवाड यांनी स्वत: भाजीपाला खरेदीचा व विद्यार्थ्यांनी बनविलेल्या खाद्य पदार्थांचा आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले व या उपक्र माबाबत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. इमपथी फाऊंडेशनकडून बांधून देण्यात आलेल्या नवीन शालेय इमारतीची सभापती गायकवाड यांनी पाहणी केली तसेच शाळेच्या प्रगतीबाबत समाधानही व्यक्त केले. याप्रसंगी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.बाल आनंद मेळाव्यात परिसरातील भाजीपाला - फळे, पाककृती, व्यवसाय ओळख, व्यवहार ज्ञान, मूलभूत क्रि या, नवनिर्मिती, मनोरंजन आदी आनंददायी शिक्षणाची वैशिष्ट्ये अनुभवायला मिळाली. यात भाजीपाला व फळे स्टॉल, पोहे इडली,भेळ,गुलाब जामून,कुळिद जिलेबी,पाणी पूरी,समोसे आदी खाद्यपदार्थ स्टॉल, हेड मसाज, हस्त कलाकृती , मनोरंजक खेळ स्टॉल मांडणयात आले होते. सदर मेळाव्याला ग्रामस्थांनी भेट देत खरेदी केल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पडली. या मेळाव्यात हजारो रूपयांची उलाढाल झाली. या मेळाव्यास मुख्याध्यापिका उज्वला मेतकर, किरण कापसे, कल्पना बोचरे, संतोष गायकवाड, रशिद पटेल, योगेश देशमुख, दगुजी सोनवणे आदिंसह पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पिंपळगावलेपच्या शाळेत भरला बाल आनंद मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 5:56 PM