कोकणगाव : स्थानिक कामगारांना डावलून अन्य कर्मचाºयांची भरती सुरू होत असल्याप्रकरणी पिंपळगाव येथील टोलनाक्यावर टोल कर्मचाºयांनी टोल वसुली बंद आंदोलन सुरू करून नियमित कामकाज बंद पाडले आहे.स्थानिक कर्मचाºयांनी आक्षेप घेतलेल्या कर्मचाºयांना त्वरित काढून टाकावे, स्थानिक महिला कर्मचाºयांना कामावरून काढले आहे त्यांना पुन्हा कामावर घेणे, भरतीमध्ये स्थानिक कर्मचाºयांनाच स्थान द्यावे आदी मागण्या या आंदोलकांनी यावेळी केल्या.या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्णय कर्मचाºयांच्या बैठकीत घेण्यात आला.या कर्मचाºयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक पुढारी उपस्थित होते.यात यतिन कदम, बापू पाटील, सतीश मोरे, वैकुंठ पाटील, बाळासाहेब आंबेकर, मीना बीडगर, पंकज होळकर, पांडुरंग भडांगे, गायकवाड तसेच टोल कर्मचारी उपस्थित होते.
पिंपळगावी टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:45 AM
कोकणगाव : स्थानिक कामगारांना डावलून अन्य कर्मचाºयांची भरती सुरू होत असल्याप्रकरणी पिंपळगाव येथील टोलनाक्यावर टोल कर्मचाºयांनी टोल वसुली बंद आंदोलन सुरू करून नियमित कामकाज बंद पाडले आहे.
ठळक मुद्दे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्णय