पिंपळगाव बसवंत : वणी - सुरत महामार्गावर झालेल्या अपघातात येथील दुचाकीस्वार सोमेश्वर हिरामण मोरे हा जागीच ठार झाला तर रतन तानाजी घुटे गंभीर जखमी झाला.शुक्र वारी रात्रीच्या सुमारास वणी सुरत मार्गावर पिंपळगाव बसवंत हद्दीत अंतरवेली फाटा येथे वणी कडून येणारी सुपर स्पेलण्डर या दुचाकीस पिंपळगावकडून जाणाºया अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील सोमेश्वर हिरामण मोरे (२५) रा.पिंपळगाव बसवंत कोळी वाडा, ता. निफाड हा जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला रतन तानाजी घुटे (२७) रा.पिंपळगाव बसवंत कोळीवाडा हा जखमी झाला. त्यांना तातडीने येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर अपघाताची पिंपळगाव बसवंत पोलिसांत नोंद करण्यात आली.
वणीजवळ अपघातात पिंपळगावचा युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 4:14 PM