ठळक मुद्देबसवाहक योगेश गरुड यांच्याविरुद्ध पत्नी रेखा यांनी तक्रार दाखल केली
नांदगाव : तालुक्यातील पिंपरखेड येथील एका विवाहितेने संसाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पतीविरुद्ध नांदगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.संसारापासून वंचित ठेवणे, सतत घराबाहेर राहणे, पत्नी व मुलांची जबाबदारी न घेणे, तसेच घरखर्चाला पैसा न देणे या कारणास्तव पिंपरखेड येथील बसवाहक योगेश पंजाबराव गरुड यांच्याविरुद्ध पत्नी रेखा योगेश गरुड यांनी सदर तक्रार दाखल केली आहे.