वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील पिंपळनारेच्या उपसरपंचपदी सुरेखा गुमनार यांची अटीतटीच्या लढतीत निवड झाली. उपसरपंचपदाचा अनिल कोठुळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी निवडणुक घेण्यात आली. यावेळी सुरेखा गुमनार यांना सहा तर समाधान गांगुर्डे यांना अवघे तीन मते मिळाली. ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता निवडीसाठी एकच गर्दी झाली होती. सोसायटीचे सभापती अनिल कोठुळे यांच्या कडून सुरेखा गुमनार तर विद्यमान सरपंच मंदाकिनी कोठुळे यांच्याकडून समाधान गांगुर्डे यांनी उपसरपंचापदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. माघारीपर्यंत आटोकाट प्रयत्न करण्यात आले. मात्र यश आले नाही. सरपंच मंदाकिनी कोठुळे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांना चिठ्ठी वाटप करुन गुप्त मतदान घेण्यात आले. मतदानात सुरेखा गुमणार यांना सहा तर समाधान गांगुर्डे यांना तीन मते मिळाली. निवडीची घोषणा सरपंच मंदाकिनी कोठुळे, एस.के. मोरे यांनी केली. यावेळी अनिल कोठुळे, सुरेश यशवंते, समाधान गांगुर्डे, गोरख आंबेकर, मीनाबाई गायकवाड, कुसुम पवार, कांताबाई आंबेकर, सोसायटीचे उपसभापती गंगाधर गुमणार शंकर. पाटील, महेंद्रसिंंग परदेशी, बाळासाहेब कोठुळे, शिवाजी गुमणार, रावसाहेब यशंवते, नंदु गांगुर्डे, योगेश अहेर, विश्वनाथ चव्हाण, बाळु गांगुर्डे, गणेश सोनवणे, शंकर गांगुर्डे, पंडित यशवंते, संतोष गांगुर्र्डे, माधव निमकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
पिंपळनारे उपसरपंचपदी सुरेखा गुमणार
By admin | Published: September 30, 2016 1:28 AM