शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जातेगाव येथे पिनाकेश्वर यात्रोत्सव

By admin | Published: March 14, 2016 11:11 PM

जातेगाव येथे पिनाकेश्वर यात्रोत्सव

नांदगाव : तालुक्यातील जातेगावपासून पाच किमी अंतरावर असलेल्या पिनाकेश्वर मंदिरात यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जीर्णोेद्धाराच्या वर्धापननिमित्त हा यात्रोत्सव दरवर्षी भरविला जातो. यंदा ५१ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.सह्याद्री पर्वतरांगेतील शिखरावर पिनाकेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी सन १९६४ मध्ये हेमाडपंती पद्धतीचे बांधून परिसरातील नागरिकांच्या मदतीने जीर्णोद्धार केला. श्रीक्षेत्र काशी येथून देवीदेवतांच्या मूर्ती आणून चैत्र शु. नवमीस मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी या तिथीस यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचे सभागृह, भंदारगृह व इतर बांधकामे ब्रह्मचारी श्री गंगागिरी महाराज यांनी पूर्ण केले. गेल्या सोमवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून ३० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी पिनाकेश्वराचे दर्शन घेतले असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित यावे, यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरूआहेत. यात्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)कारच्या धडकेत युवक जखमीसिडको : येथील सावतानगर भागात सायंकाळी एका कारने युवकास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.मयूर पवार (१६, रा. शिवशक्ती चौक) हा रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने (एमएच १५/इ-७३०५) धडक दिल्याने डोक्यास मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)