शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

गाजलेल्या गीतांभोवती ‘पिंगा’

By admin | Published: November 28, 2015 11:18 PM

परिस्थिती बदलली : मराठी व्यक्तिरेखांचीही हिंदी चित्रपटसृष्टीकडून दखल; भाषेसाठी लाभदायी

सुदीप गुजराथी, नाशिकहिंदी चित्रपटसृष्टीत मराठी अभिनेत्यांनी केवळ नोकराच्या भूमिका साकारण्याचे दिवस आता जसे इतिहासजमा झाले, तशीच परिस्थिती मराठी गाणी, लोकगीते व व्यक्तिरेखांबाबत निर्माण झाली आहे. मराठीची दखल घेणारे असे सिनेमे तिकीट खिडकीवरही यशस्वी ठरत असल्याने गेल्या काही वर्षांत मराठी गीतांभोवती बॉलिवूड ‘पिंगा’ घालू लागल्याचे चित्र आहे. सध्या गाजत असलेल्या ‘पिंगा’ गीताने यावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे. अवघी हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत वसलेली असूनही काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदी चित्रपटांत मराठी व्यक्तिरेखा जवळपास दिसत नव्हत्या. बहुतांश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक हे देशाच्या उत्तरेकडील असल्याने त्यांचा प्रभाव बॉलिवूडवर दिसून येत होता. मराठी व्यक्तिरेखा, गाणी, एवढेच नव्हे, तर मराठी अभिनेत्यांनाही हिंदीत फारसे मानाचे स्थान नव्हते. गेल्या काही वर्षांत मात्र बॉलिवूडमध्ये संपूर्ण मुंबईत वाढलेली नवी पिढी सक्रिय झाल्यानंतर चित्र पालटले आहे. चित्रपटांत आवर्जून मराठी व्यक्तिरेखा दिसू तर लागल्याच; शिवाय त्या लोकप्रियही होऊ लागल्या. नव्वदच्या दशकातील ‘हेराफेरी’ चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे या मराठी पात्राला देशभरातील रसिकांनी डोक्यावर घेतले होते. अगदी अलीकडच्या ‘सिंघम’मध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका केलेले बाजीराव सिंघम हे पात्रही मराठीच होते. त्याचा ‘आता माझी सटकली’ हा डायलॉगही तुफान हिट झाला होता. काही वर्षांपूर्वी गौरी शिंदे या मराठमोळ्या दिग्दर्शिकेने बनवलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवीच्या मुख्य पात्राचे नाव शशी गोडबोले होते. शिवाय याच चित्रपटातील ‘नवराई माझी लाडाची’ हे गाणे गाजले होते. अमिताभ बच्चन यांनी ‘सरकार’मध्ये सुभाष नागरे, अभिषेक बच्चन यांनी ‘हॅपी न्यू इअर’मध्ये नंदू भिडे नामक मराठी पात्राची भूमिका रंगवली होती. ‘पिंगा’ला मराठी गीतांचा आधार४बाजीराव मस्तानीतील ‘पिंगा’ या गीतातील ‘लटपट लटपट’ हे शब्द व चाल सन १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील, तर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या ओळी तसेच नृत्याच्या स्टेप्स ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या सन १९७५ च्या चित्रपटातल्या ‘नाच गं घुमा’ गीतातील मंगळागौरीच्या खेळातील आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपटही व्ही. शांताराम यांचाच आहे. ‘बाजीराव मस्तानी’तील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आली अप्सरा... आली सुंदरा’ या दुसऱ्या गीतातील शब्दही मराठीच आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीची घेतली जाणारी दखल सुखावणारी आहे. पूर्वी लाहोर, कराची, पंजाब या देशाच्या उत्तर भागातून कलावंत येऊन मुंबईला चित्रपटसृष्टीत स्थिरावत. आता मात्र संपूर्णत: मुंबईत वाढलेली दिग्दर्शकांची पिढी चित्रपट तयार करते आहे. साहजिकच मराठी पात्रे, गाणी हिंदी चित्रपटांत आवर्जून येत आहेत. शिवाय महेश मांजरेकर, मधुर भांडारकर यांच्यासारखे मराठी दिग्दर्शकही सिनेमे बनवत आहेत. पूर्वी फक्त सई परांजपे यांनीच हे केले. एकूणच, मराठी लोक, इतिहास, साहित्याकडेही लक्ष वेधले जाणे ही चांगली गोष्ट आहे. भाषा जितकी वापरली जाईल, तितकी ती टिकते आणि वाढते. म्हणून हे मराठी भाषेसाठी फायद्याचेच आहे.- कौशल इनामदार, संगीतकार