शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

राज्यपालांच्या आगमनाने पसरले गुलाबी चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 12:07 AM

श्याम खैरनार सुरगाणा : गुलाबी गाव म्हणून लौकिक असलेल्या सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आगमनामुळे अवघ्या ...

ठळक मुद्देभिंतघरला दिवाळी साजरी : सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण, गोशाळेचे उद‌्घाटन

श्याम खैरनारसुरगाणा : गुलाबी गाव म्हणून लौकिक असलेल्या सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आगमनामुळे अवघ्या गावात गुलाबी चैतन्य पसरले आणि ग्रामस्थांनी सडा-रांगोळी घालत, गुढ्या उभारत जणू दिवाळीच साजरी केली. राज्यपालांनीही या आदिवासी संस्कृतीशी आपली नाळ जोडली असल्याचे सांगत भरभरून कौतुक केले आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर चिंतन केले.

तालुक्यातील रोकडपाडा ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत असलेले गुलाबी गाव भिंतघर येथील आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीचे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले तसेच येथील गोशाळेचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोश्यारी यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना सांगितले की, मला आदिवासी संस्कृती आवडते. येथील लोक प्रकृतीने चांगले आहेत. मी नंदुरबारमध्ये गावातच राहिलो होतो. आदिवासी भागातील महिलांना केवळ सात किंवा दहा हजार रुपयांचे चेक देऊन फारसा उपयोग होणार नाही. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

शेतीसह सर्व कामे व्यवस्थित व्हावी यासाठी मी व सरकार प्रयत्न करत आहे. पेसा कायद्याअंतर्गत चांगले अधिकार दिले आहेत. पूर्वीपेक्षा आत्ताचा काळ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय धावपटू कविता राऊत व एवरेस्ट शिखर पादाक्रांत केलेली हेमलता गायकवाड या दोघींचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. स्नेहा शिरोळे यांनी केले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोडे, जि. प. सदस्य कलावती चव्हाण, एन . डी. गावित, रोकड पाडा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच कांतीलाल खांडवी आदी उपस्थित होते.वनपट्टा सातबारा लाभार्थ्यांना सुपूर्दकार्यक्रमात वनपट्टा लाभार्थी तुळशीराम लहानु जाधव (भिंतघर), गुलाब पांडू वाघेरे(अंबोडे), बंसू काशिराम कडाळी(भिंतघर)या तीन आदिवासी मजुरांना वनपट्टा सातबारा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थी विमलबाई किसन जाधव (भिंतघर) यांना घरकुलाची चावी सुपुर्द करण्यात आली. .राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आमच्या गावात आल्याने खूप आनंद झाला. या गावात आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून हातसडीचा तांदूळ, आकाशकंदील, वनौषधी इत्यादी व्यवसाय करतो. त्यांच्या या दौऱ्यामुळे मार्केटिंगला वाव मिळून सर्व महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतीमालाला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.- सविता जाधव, सखी महिला बचत गटराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणी, रस्ते, सपाटीकरण, शिक्षण, आरोग्य व्यवस्था यांचा समावेश आहे. आमच्या मागण्या पूर्ण होतील याची खात्री आहे.- कांतीलाल कृष्णा खांडवी, सरपंच

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी